Total Pageviews

Sunday 5 January 2014

कोपरा...



दररोज सकाळ जागी झाली...कि
माझे पाय एका जागी वळतात...
रात्री न जाण्याचा खोटा वायदा करुन... मी परत तिकडे जातो...

वेगळ नातं आहे माझ त्या जागेशी...
कोण कट्टा म्हणत कोण नाका...
पण माझ्यासाठी तो एक सुखद कोपरा आहे ... आयुष्याचा...

दोस्तांच्या घोळक्यातला सुखद कल्ला...
लहान गोष्टी वरून झालेली भांडण...
" तु एकही मेरा भाई!!" असे ऐकल ... की एकटेपणा सरशी गायब होतो...

शाळा आहे माझी समोरच त्याच्या...
शाळे समोर हि माझी दुसरी शाळा...
आणि दिवस भर मित्रांची तिसरी शाळा...

सगळ अगदि बालीश कि वय वाढल्याची लाज वाटते...
पण मित्रांना बघुन लाज पण लाजते ... दररोज...

सर्व कीती शांत आहे... असच रहाव नेहमी वाटत...

पण पोट ऐकत नाहि माझ... दररोज हिला हिरमुसल्या तोंडनी सोडुन...
मी स्वताःला विकायला दुनियेच्या बाजारात जातो...
आणि कवडी घेउन परत तिच्याजवळ येतो...
तिही तक्रार न करता पटकन जवळ घेते...
सर्व ताण आणि तहान क्षणात निसटतो...

आणि...मग परत सुरु होतो तो रात्रीचा कल्ला...
लहान लहान भांडण ... भाई मेरा ची प्रेमाची हाक...
मेल्यावर माझ प्रेत दोन क्षणतरी ठेवा रे इकडे...
शेवटी एकदा भेटलो की निवांत जाईन मी...

मी हरवलो आहे...



दररोज रात्र झाली की मला मी भेटतो...
मग माझा हिशोब सुरु होतो...
बाकी नेहमी काहिच नसते...

बस मधुन मी आज तिला पाहिल...
 कोवळ्या उन्हात ती तान्हुल्याला बसुन दुध पाजत होती...
रोज तिला बघतो मी... आणि रोज मला दिसतो मी...
कधी दुध पिताना कधी झोळीत उन खाताना...

हायवे च्या कडेला ... जिथे एका फुटाला २०००० मिळतात...
तिथेच ह्या बयेने करोडो रूपयाच्या पुलाला घराच छप्पर केल आहे...
लोक म्हणतात भिकारी म्हणुन... पण मायेची चुल तिने आत ठेवली आहे...

बाप दिसत नाहि पोराचा मला कधी... तिच्या डोळ्यातुन पण तो हरवला आहे ...
जुन्या काळचा मी दिसतो मला नेहमी ... पण आता तो मी हरवला आहे...
आई तशीच आहे .... पुला खाली आणि घराकडे... पण आता मी हरवला आहे

गुप्तधन!!

एक थैली आहे कापडाची माझ्याकडे...
दररोज सोबतच घेउन फिरतो...
नेहमी कडेजवळ बाळगतो...
उन नाहि लागु देत ... पावसात नाहि भीजु देत...
कुशीत घेतो वारा लागला की...
घरी झोपताना पण सोबतच ठेवतो...
पण सहसा उघडत नाही ...

न राहून त्याने विचारल... " आहे तरी काय, त्यात?"

खोल कुठेतरी... मन मारुन ठेवलय रे... आत...
पण मुडदा गाडवत नाहि... जीव अडकलाय रे ...त्यात
असं म्हणुन थैलीकडे बघितलं
आणि हळुच उराशी कवटाळुन बोललो....
" माझ पण मन नाहि रे जगण्यात...
म्हणुन तर मारुन ठेवलय बोचक्यात"

अबोल नातं!!



एक घर होत कुडाच...छप्पर कौलाच...
आणि राहणार्या माणसाच मन मातीच...

पावसात घर गळे... आणि शांततेत पाणि गोंगाट करे...
कुडाच्या भींतीं थोड्या ओल्या होत... थोडा ओलावा रुक्ष वाळवंटात मिळे...

उन्हाळ्यात कौलातुन उनासाठी थोडी जागा ठेवली होती...
दिवसभर खेळुन ते पण संध्याकाळी आई कडे जाई निजायला...

हिवाळे तसे रुक्ष असायचे...
रात्री सगळे झोपले कि घर पण रात्री एकटेच कुडकुडायचे...

घर आणि मी दोघं असे जगत होतो....
वर्षा मागुन वर्ष मोजत होतो...

पण कधी तक्रार नाही केली ... मी पण आणि त्याने पण...
एकमेकांशी बोलायचे कधीच केल नाहि मन...माझ पण आणि त्याच पण...

सकाळची घाई नसे आणि संध्याकाळच्या गप्पा पण...
घराची चुल पण थंड होउन वर्षे उलटली होती...
चुलीचा धुरच नव्हता तर डोळे कुठुन जळजळणार...
किती सुखाने मी घरात उदास राहतो...

अजीब(अजीज?)



शायद कुछ रिश्ते बहूत अजीब होते है|
तभी मीठे लगते है जब भी थोडे कडवे होते है||

कुछ पल बहुत अजीब होते है|
अक्सर गुजरने के बाद और हसीन होते है||

कुछ आँसु भी थोडे अजीब होते है|
बिना निकले हि आँखे भिगा देते है||

पता नहिं शायद कुछ हवाँये भी अजीब होती है|
जब नहि होती जरासी भी तभी सबसे ज्यादा महसुस होती है||

कुछ सितारे भी बडे अजीब हो जाते है|
जो हमे छोड पुरे दूनिया की किस्मतो मे चमकते है||

या फिर ....शायद हम भी जरासे अजीब है|
जो बिन बात दिल लगा लेते है||